दगड

एक भला मोठा माणूस
काळा दिसत होता
तिथे जाऊन पहिले
तर तो दगड होता

तो दगड होता
पण सुखद हसत होता
मन ओढून घेतले
मला सोडत नव्हता

माणूस आज असा
मिळावा कोठे
तो सतपुरूषच असेल
असतील आदर्श मागे

होता वाटेवर उभा
पण कोणाला अडवत नव्हता
मात्र पुढे जाताना
काही सांगत होता

विचारले मी त्याला
नाव काय तुमचे
तो काहीच बोलेना
कारण तो एक
दगड होता.