मी कधीच टेकडी चढलो नाही
किंवा रेंगाळलो नाही धक्क्याच्या शेवटापर्यंत
बघण्यासाठी पावसात फिरणारे
नक्की काय हुडकत असतात बरं तिथं?
किंवा पुस्तकही कसं उलगडलं नाही अपघातानं
जिथे तू सही केली होतीस गुप्तपणं
तसंही ते पुस्तक उलगडणारं नव्हतंच मुळी
आणि फरक काय पडतो म्हणा
जग वाहून गेलं
जिथं गलबतं जात होती
खूप दूरवर
काही मार्ग होते ज्ञातापलीकडे
घरी परतल्यावर कळलं
कोकरू भरकटलंच
काळोख्या जंगलात
एकीकडे टीव्ही चालू होता
आणि दुसरीकडे कुत्रा
जिभल्या चाटत
सुखानं पिरंगत
दोघेही