संधिवात

एका चौकोनाची आस होती
वर्तुळ कसं गवसलं माहीत नाही

संधीच मिळाली नाही, नाहीतर...
चिंधी जतन करायची काय गरज होती?

आता खांद्यावरचं  ओझं उतरलंय
संधिवाताचं औषध शोधत आहे