वाद्यसंगम

(वरदाची कविता)

वाद्यसंगम

वाद्ये निरनिराळी, पेटी तबला गिटार बासरी
वीणा तंबोरी सतार, संगतीला तारी धारदार
ढोलकी ढुमढुम बाज, असे हे वेगवेगळे आवाज॥१॥

साथसंगत करी एकमेकांना, दंग करी आवाज मधुर श्रोत्यांना
म्हणती यास वाद्यसंगम, यांची होते एक सुरेल सरगम
ईश्वराची कृपा झाली, ऐसी वाद्ये आपणांस मिळाली॥२॥