चापलूस चमचा : नागपुरी तडका

चापलूस चमचा : नागपुरी तडका
हलक्या-पतल्याचा जमाना, राह्यलाच नाही
शाम्यासारखा इब्लिस, म्या पाह्यलाच नाही...
पोम्याले म्हणे तुनं, शरम काहून विकली
मिशी पकून गेली तरी, अक्कल नाही पिकली
मुकरदमच्या चपला, चक्क डोक्यावर घेते
एवढा कसा लाचार, त्यायचे धोतरं धूते
असा चापलूस चमचा, कधी झालाच नाही ...
चारचौघात गेला तं, अक्कल तारे तोडते
शोकसभेत बोलंण तं, जम्मून भाषण झोडते
असे गुण गावते, जे मयतात असण-नसण
याचं भाषण आयकून, थो मुर्दा हासत असण
प्रेतावर हार मात्र, कधी वाह्यलाच नाही....
सिनिमा पाहाले जाईन तं, सुदा नाय बसणार
लंबी तंगडी करून, खिदळ-खिदळ हासणार
थेटरमंधी दूरवर, याचाच डंका गाजणार
पडदा फ़ाटेपावतर, याच्या शिट्या वाजणार
पण जिंदगीचा डाव, कधी हारलाच नाही ...
  
             गंगाधर मुटे