यशाला गाथा असते
ती वाचली जाते
तिचे कौतुक होते
कष्टाचे चीज, सार्थक
वगैरे शब्दांचा भाव वाढतो
शेअर बाजार वधारतो
अपयाशाची व्यथा असते
ती मांडता येत नाही
पटतही नाही
संशयाचा पारवा घुमतो
मग म्हणतात, "अरे हा बंडलबाज आहे"
"तू जरा दूर हो बरं
आजची लाईन , तुझ्यासाठी नाही
बोर्ड वाचता येत नाही कां ?
का वाचलाच नाहीस? '
निरनिराळे दोष दाखवले जातात
जीव तोडून लिहिलेले
जीवन संग्रामाचे पुस्तक
रस्त्यावर बसून विकण्याची वेळ येते
आधीच अपयश
मग कर्माला हात
अशानं कुठे गिऱ्हाईक येतं का?
पब्लिशर मिळत नाही
तो हा असा
म्हणूनच म्हणतो,
"गाथे करीता यश हवे
यशाकरिता गथा हवी"
अगदी नवराबायकोसारखी