मी फुलांचे 'हार' केले

मी फुलांचे हार केले

हार घालुन सत्कार केले

सत्कार कौतुकाचे होते

कौतुक साहसाचे होते (१)

हार घालून सत्कार केले

त्यांनि अन्याय्य प्रहार केले

प्रहार राजकिय होते

राजे नीतीभ्रष्ट होते (२)

सत्कारात स्वार्थ होता

कौतुकात प्रेरणा होती

मी शब्दांची सुमने वाहीलि

त्यांनि सु-मनाना घायाळ केले (३)

पुष्पे हि कोमेजुन गेली

मने हि कुजुन गेली

 मने हि समजुन गेली

पुष्पासम निर्माल्य  झाली (४)

--सुर्यकांत मा.