कसे फेडु प्रेमाचे पांग

मनात माझ्या येते काही

का बैचेनि समजत नाही  (१)

याद तुझी मज सतावत राही

सुख-दुखानी लोचन वाही(२)

जाताना मग हळवे होणे

उगाच नयन भरुन पाहणे(३)

पाऊले हि पुसून गेली

मनास माझ्या पुसून गेली(४)

आलीस जीवनि, का बरे सांग

कसे फेडु प्रेमाचे पांग..(५)

--सुर्यकांत मा.