वेडा कवी ...

माझ्यातच गवसला मला

असाच एक कवी वेडा ...
गतकाळच्या आठवणी साऱ्या
अन् पानभर शब्दांचा सडा ...
म्हणतो हसून मला
आठवणी आणतात रोज नवा बहर ...
मनातल्या भावनांनाही येते मग
उमलण्याची वेडी लहर ...
तोच देतो शब्दांचे बोट
त्या उफाळणाऱ्या मूक भावनांना ...
मग त्याही बोलक्या होतात
हळुवार कागदावर उतरताना ...
कसं सांगू त्याला 
त्याच्या शब्दांनी माझं जग जिंकलं आहे ...
घेऊन त्याचं श्रेय सारं
स्वतःशीच मी हरलो आहे ...
माझ्यातच गवसला मला
असाच एक कवी वेडा ...
गतकाळच्या आठवणी साऱ्या 
अन् पानभर शब्दांचा सडा ...
                                         ... वेडा कवी - अमोल