मी काही मरत नाही

ताटकळली अप्सरा दारात स्वर्गाच्या
वाट पाहते माझी, 
पण मी काही मरत नाही

कथा ऐकतो रोज रंभेच्या नाचाच्या
तरसले डोळे माझे,
पण मी काही मरत नाही

मल्लीका म्हणे मेल्यावर होणार आहे उर्वशी
निदान तोपर्यंत तरी ,
 मी काही मरत नाही

काल म्हणे मेला मल्ल्या, गेला वर दारू बनवायला
अरे, इथलीच काही संपत नाही,
आणि मी काही मरत नाही

चित्रगुप्ताच्या वहीत म्हणे फक्त कवींचीच नावे आहेत
मला तर कविता जमत नाही,
आणि  मी काही मरत नाही

सांगायचे आहे यमाला,
ये एकदा आमच्या गावाला,
इथल्या खडड्यांना  घाबरला
म्हणाला जागा नाही 'रेडा' पार्कींगला
 तो काही येत नाही आणि  मी काही मरत नाही

* संपूर्ण काल्पनिक
* कोणाचा संदर्भ जुळलाच तर निव्व्ळ योगायोग.