मार्केटिंगचा पोवाडा

उठा मराठमोळ्यांनो
माझ्या बंधुबांधवांनो,
         करू नवे उद्योगधंदे
         अभ्यासू ट्रेंड मार्केटींगचे  ... जी रं जी रं जी

समजा,
         पाहिलेत सर्गीच्या त्या सौंदर्याला
        आणि
         थेट प्रश्न तुम्ही केला
        अगं! तुजविण अर्थ काय जगण्याला
         काही पैशाचा तोटा कधी मला
        'हो' म्हण माझ्याशी लग्न करण्याला
        अहो 'डायरेक्ट मार्केटींग' ही कला..... जी रं जी रं जी

आता,
        तुम्हीच सांगा एका दोस्ताला
        तुमची ओळख सांगायला
        'हो' म्हण त्याच्याशी लग्नाला
         अगं पैशाने भरला त्याचा बंगला
       ह्याहून नाही भेटणार चांगला
      अहो, 'एडव्हर्टायझिंग' ची ही कला...   जी रं जी रं जी

अहो जाताजाता
       पाहिलेत लाखातल्या देखणीला
      फोनवर तिच्याशी बोलला
      दोन मिनिटात विचार पटविला
     ताबडतोब निर्णयच झाला
    जगी,' टेलीमार्केटींग' म्हणती याला
     अहो बोलण्याची ही कला ......जी रं जी रं जी

एखाद्यावेळी,
       सामना गोड ललनेशी झाला
      आणि एटीकेटसचा अतिरेकच झाला
     तिने पाडलेली पर्स हो ऊचला
     तीचा ग्लास सॉफ्ट ड्रींकने भरला
     हलकेच मागणी घातली तिला
    अहो, ' पब्लिक रिलेशन्स' म्हणती लोक याला.....जी रं जी रं जी

एका गोड क्षणी,
     बघितलीत ती लावण्यवती बाला
     पार्टीत चमत्कार की हो झाला
    ती स्वतःच थेट आली बोलायला
    'अहो' लक्ष्मी प्रसन्न तुम्हाला
   मी तयार आहे लग्नाला
   अहो! 'ब्रँड रेकग्निशन ' म्हणती याला.....जी रं जी रं जी

काय सांगता,
    नखरा देखणीचा रस्त्यात बघितला
   थेट तुम्हीच तिच्याकडे गेला
  म्हणालात,
   वाहतो माझी श्रीमंती तुला
  माझ्या फुला देतो तुज मी बंगला
  हो, म्हण माझ्याशी लग्नाला
  तेव्हढ्यात,
  सण्णकन आवाज झाला
  तुमचा गाल कोणी लाल केला
  अहो, 'कस्टमर फीड बॅक' म्हणती याला.....जी रं जी रं जी

अचानक आवाज घोगरा झाला
खळी पडली तिच्या गोऱ्या गालाला
जीव तुमचा वरखाली हो झाला
श्रीमंतीचा तुम्ही दिला हवाला
आणि, हास्याचा खळखळाट हो झाला
'अहो.. तिने हाक मारली नवऱ्याला
म्हणाली जरा भेटा हो याला
वेड्यांनो,
त्याने निष्कारण वेळ विचारात घालवला
जगात,
'डिमांड अँड सप्लाय गॅप' म्हणती याला.......जी रं जी रं जी

तुमच्या आधीच,
    भेटला एखादा श्रीमंत तीला
   तुमचा घासच कोणी पळ्वून नेला
   जगी 'काँपीटीशन' असे नाव याला.......जी रं जी रं जी

कधी नव्हे ते,
   लागले होते यश यायला
  स्वर्ग दोन बोटे ऊरला
  ऐनवेळी तुमच्याच पत्नीने प्रवेश केला
  म्हणाली,
  'जरा घ्या कडेवर बाळाला'
 तर मित्रांनो,
'रिस्ट्रीक्शन फॉर एण्टरींग न्यू मार्केटस'  असे म्हणतात याला....जी रं जी रं जी

योग्य तो निर्णय घेण्याची कला
आज तुम्ही शिकला
चला, बांधवांनो
उद्योगधंद्याकडे वळा.
     
                                       (एका इंग्रजी वर्तमानपत्रतील कल्पनेचा स्वैर अनुवाद)