प्रत्येक पायरीवरती गलबलतात आठवणी
अवघड प्रसंगी तोंडात धरलेली ती गुळणी
तुंबले मन, करावे मोकळे कोपऱ्यात पटकन
थुंकावा जिव्हारस भिंतीवर मनसोक्त पचकन
नामांकित खेळाडू थुंकतात मात्रुभुमीवर
नाईलाज, अभक्ष भक्षण घशाशी आल्यावर
आव्हाने सहज फेकतो प्रतिस्पर्धी तोंडावर
चुंइंग-गम खातो आणि थुंकतो इज्जतीवर
परदेशात आम्ही भीतीने आवंढे गिळणार
जपणार रुमालात, आलाज ऐवज बाहेर जर
गुलाम आम्ही व्यक्तीस्वातंत्र्यावर थुंकणार
ह्या बोटाची थुंकी त्या बोटी लिलया करणार
मावा, तंबाखू, पान ह्यांची देवाणघेवाण
मळासहित हाताच्या , चुना अन तंबाखू मळणं
दडली आहे ह्यातच मानवता आणि संस्कृती
बाजूस हात पसरतो विसरून इज्जती, इभ्रती
वर्षाव होतो तोंडावर नकळत, आकाशातून
पिचकाऱ्या मारतात वीर चालत्या गाडीतून
शिंतोडे नेम धरून, बोटांच्या बरोबर मधून
जमले तर बघितलेच असते सुर्यावर थुंकून