सरपंच

बिनईरोध निवरनुका
अन, गावान लय भारी सरपंच होला
हातान पेनसल कवा पकरली नाय
पन, जापना बघसाल तर निस्ता बोलबच्चन

त्येन एकडाव,
गावान लावली साक्षरता म्होईम
आंगठ्याला फासला खरू अन केला
फल्याचा उद्दघाटण

येकदा लावली सोछता म्होईम
लावला फोटू गारगे बाबाचा
झारू झेतलेला
फाटक्या कपऱ्यातला बाबा बोतला
'गोपाला गोपाला'
सरपंच बोतला
ह्यो डोकरा कं करनार
ह्येला येऊंदे तर खरा
गावच लावतो झारायला
बाबा काय आला नाय
सरपंच तवा लय बिघरला
म्हनला
मना सापरला तर म्या दावरतोच  तेला

सद्दामदाला म्हन आपन लय मानतांव
का रं बाबा?
तं बोतला
त्यो बी इराकचा राष्ट्रवादी हं

कोनीतरी बोतला,
यस टी कॅंडीडेड येनार
तवा लय इचार केला
अन लासला मंग सरपंच बोतलाच
ए, दादूस, गावांन म्हामंडलाचा कं काम ?

ह्या गऱ्याला सिकसान नाय ह्यो खरा
पन समद्यास्नी बनविताव बकरा
दिरक्या खायाला तं लय हावरा

कं करशील बाला
आरं समद्या भारतांन
आसलीच जतरा

आता बोल बरा
म्हान हाए खरा
माझा भारत बिचारा

* कोणाचीही टिंगल करणे हा उद्देश नाही.
* भाषेचा वापर केवळ चपखलपणासाठी.
*समस्त देशातील नेत्यांचे सामाजिक व जागतिक ज्ञान
  ह्यावर ब्यंग.
*कोणाला दुखावणे हा उद्देश नाही.