" विद्यार्थ्यांनो"...!
नका संपवू सुंदर जीवन ।।ध्रु॥
जिंकाल तुम्ही सारे त्रिभुवन ।
फिरून चौऱ्यांशी लक्ष योनी।
मानव जन्म लाभे भाग्यातुनी।
आठवण त्याची ठेवा मनी॥
जाऊ नका उगी भांबावून॥ध्रु॥१॥
खेळण्या बागडण्याचे हे तुमचं वय।
ठेवू नका मनी कशाचेही भय॥
संकटाची करू नका कसली गय॥
सामना करा त्याचा निक्षून ॥ध्रु॥२॥
आत्महत्या करणे असे पाप।
मानव जातीला असे तो शाप॥
विसरा डोक्यातील सारे ताप॥
जीवनी फुलेल मग नंदनवन॥ध्रु॥३॥
अनंत खोंडे.
२२\२\२०१०.