होळी

चिंटू म्हणाला आईला

सांग आज तू मजला
होळी सण आहे कसला?
साजरा करती बालबाला
आई म्हणाली, चिंटूला
ऐकसांगते रे तुजला
होळी सण असतो भला
उधाण येतसे आनंदाला
सण असतो हा रंगाचा
त्यातील विविध गंधांचा
रंगात मित्र भिजवण्याचा
उत्साह वाढतो मित्रांचा
विसरण्यास वैर लावे सण
हर्षे  खेळे रंग प्रत्येकजण
पुलकित होई क्षण न क्षण
विसरण्यास लावे मोठेपण
करतात रात्री होळीचे दहन
सर्वजण करती तिचे पूजन
व्यतित करण्या बंधुजीवन
करती अवगुणांचे विसर्जन
चिंटू म्हणाला आईला
कळला अर्थ होळीचा मजला