चोरप्रवेश झरोक्यातून कवडशाचा
अन मनाच्या खोल गाभाऱ्यात वासनेचा
लपते इभ्रतच काळा आडोसा घेउन
अन, हैदोस चोर, बेदरकार निर्लज्जांचा
मोहरावर मेंदुतल्या नाहकच होतो
वेगवान मारा खरिदल्या गारपिटीचा
स्वाभिमानी अश्रुंचा बाजार मांडला
अन, हरवला ताटवाच धुंद रोमांचाचा
पैशाने पेटलेल्या त्या तप्त वणव्यात
होरपळतात समिधा सदाचाराच्या
लिलाव अप्सरांच्या हेलकाव्यांचा
ज्यादा दौलतीमुळे येणाऱ्या मस्तीचा
बुद्धीवरचा तवंग नितीमत्ता झाकतो
अन, चारित्र्याचा घाउक बाजार रंगतो
तंग हवादेखिल नशेतच दंग राहते
अन, सोडून संग अंगाचा लहरतात वस्त्रे.