नांगराला जुंपत डोळ्याला बांधले चित्र सुंदर हसरं
गळ्यातील दाव्यास मंगळसुत्र, नाही म्हणणार वासरं
सासरी हो असती माया आणि ममतेची ओसाड वावरं
घालते तुळशीला पाणी ,जरी झाले होतेच मातेरं
म्हणते कोणासही बाबा आणि परक्या बाईस ती आई
बोलवे ना कुणी बाळ, बेटा, छकुली म्हणती सुनबाई
सासरची थोरवी असे पोकळ वासा अन नुसतीच धिप्पाड
छान हसरे शरीर गोंडस ते चेहरे अन मनाची चिपाडं
लाच खाल्लेला लाचार अधिकारी देव तस वागला
हाडे जोडली , ठिसुळ चंदनाची चुपचाप झिजण्याला
किती प्रयत्न केला तरी नाहीच जात मनामधून माहेर
भकास बाभळीला म्हणते ती मोगरा फक्त प्रेमाखातरं
नाही लागतच पाड पक्षी झालेत मुके ती टपली गिधाडं
नाही फुटणार ही निर्दयी गाठीची द्वाड कठीण लाकडं
दुःखी ना व्हायचे करू प्रसन्न मंदिर तिने आज ठरविले
फुलणारा गुलाब बघून काही काटे नम्रतेने वाकले
ऊमेदीत फुटल्या हिरव्या पालवीचे स्वागतच तिने केले
धोतऱ्याच्या पीकास चाफ्याचेच कुंपण मग घालून टाकले.