किलबिल

पक्षी चार विसावती
एका फांदीवर
दूर एकटक कोठे
लावून नजर...

वेळ सायंकाळची नि
आकाश रंगीत
पक्षी मूक बसतात
विसरून गीत...

वारा भरधाव येतो;
फांदीच तुटते
सारी पंगत उठते
...आणि किलबिल होते...