जीवन हे असेच असते
कधी संकटांची बिकट वाट..
कधी आनंदाची हळुवार लाट..
कधी सैरभैर रानवारा..
कधी बरसणाऱ्या पाऊसधारा..
जीवन हे असेच असते
कधी द्वेषाचा कडवट दुरावा..
कधी प्रेमाचा मधाळ ओलावा..
कधी आसवांचा संचित झरा..
कधी हास्याचा अमित फवारा..
जीवन हे असेच असते
कधी सत्तेचा पाशवी खेळ..
कधी त्यागाचा तृप्त मन मेळ..
कधी पैशाचे प्रदर्शन ओंगळ..
कधी दानाची परार्थ ओंजळ..
जीवन हे असेच असते
कधी पाठीवरती खंजीरघात..
कधी सावरणारे मदतीचे हात..
कधी शत्रुचा मत्सरी हव्यास..
कधी मित्राच प्रेमळ सहवास..
जीवन हे असेच असते..
जीवन हे असेच असते..