वरती मांडव खाली जत्रा,
अंग सजले भयाकारा
जाऊन पहा दहा दिशांना
इंटेंसिटीचा बैल उधळला
जरी तेजाचे दान पुराणे
मात्रा वेलांटया पुरवून उरले
बैल इथे अन् बैल तिथे
घंटा गोंधळ उडवून गेले
विषय बिषय ताणू नका
बोलक्या चुका टाळू नका
परस्परां पडो ते शल्य जिवांचे
मार्ग मोकळा करू नका
झूल भरजरी, मांड शाहिरी
सोबत प्रतिभा लावण्यखणी
जुंपून गाडी बैल निघाला
मानेवरती इंटेंसिटी