निशःब्द

आजकाल तुझ्याशी बोलायचं ठरलं,

तरी शब्द ओठातच अडतो,

अन् सूचलाच एखादा शब्द,

तरी त्याला काही अर्थ नसतो.

तुझं चालू असतं गुरफटणं,

प्रयत्न कदाचित काहीतरी आठवण्याचा,

माझा सुरू असतो प्रयत्न,

तुला नव्याने समजून घेण्याचा.

दिवसामागून दिवस जातात,

प्रत्येकवेळी तू निःशब्द झालेला,

सुखी असलेल्या तुझ्या मुखवट्याचा,

रंगच  सारा उडून गेलेला.

तुझं माझ्याकडे थंड डोळ्यांनी बघणं,

अन् माझं मन गलबलून येणं,

माझं आपलं चालू असतं शोधणं,

तुझ्या डोळ्यातलं माझं घरटं.

आता खरं सांगायचं तर,

तुला विसरायचं म्हटल तरी विसरता येत नाही,

अन् माझ्या स्वप्नांनी भंगलेल्या तुझ्या डोळ्यांच्या,

आरशात मला पाहवत नाही.