अशी येते एक कळ
घेऊन जाते सारे बळ,
सहनशक्तीचे !
अशी येते एक लाट,
बंद होते सारी वाट,
व्यक्तीची !
असे येते एक वारे,
पुसून टाकते काही सारे,
अभिव्यक्तीचे!
कळ जाते,
लाट ओसरते,
वारे थंडावते !
आणि पुन्हा सुरू होते,
व्यक्तीच्या अभिव्यक्तीचे,
नव्या युक्तीचे, आसक्तीचे,
अव्यक्त जीवन
तारेवरचे...!!!