खरे नाते

मनामनातील सुंदर नाती

अनेक मने, अनेक  जाती
निवडण्याचे आपुल्या हाती
बोल प्रेमाचे बनवती नाती
कांही नाती ती प्रेमापुरती
असती कांही स्वार्थापुरती
फिरती कांही वासनेभोवती
असती खरी मायेची नाती
म्हणे असती रक्ताची नाती
प्रेम ओलावा त्यात मिळती
पैशासाठी नात्यास मारती
अशी कशी ही रक्ताची नाती?
प्रेम, माया निर्माण करती
मदत जे दुसऱ्यास करती
निस्वार्थपणे नाती जगती
खरे नाते त्यास म्हणती