जीवन म्हणजे...

जीवन म्हणजे स्वत:स पडलेले कोडे
जीवन म्हणजे आपण शिकलेलेच धडे!
जीवन म्हणजे सोबत चालत जाणे वाट
जीवन म्हणजे नकळत हाती धरला हात
जीवन म्हणजे नव्या दिशेचा मागोवा
जीवन म्हणजे जुन्या क्षणांचा परतावा
जीवन म्हणजे रोजच एखादे धाडस
जीवन म्हणजे स्वप्नच एखादे गोंडस
जीवन म्हणजे चेहर्‍यावरती स्मित खुलणे
जीवन म्हणजे नकळत अश्रूंनी भिजणे
जीवन म्हणजे पत्त्यांचे घर रचलेले
जीवन म्हणजे हवेतले काही मजले
जीवन म्हणजे वेचत जाणे काही क्षण
जीवन म्हणजे मनातले पुष्कळसे व्रण...