कोंबडी, बोकड की सुरमई फ्राय
काय आहे आजचा मेनू
माझ्या जीभेच्या चोचल्यांवर
आज कोणाचा बाबू गेनू?
मी तिच्याकडे पाहत बसायचो
संध्याकाळी तासंतास
तिच्या वॉर्डरोबचाच काय तो झाला
दोन वर्षात अभ्यास.
सोम ते शुक्र, चलती चक्र
धावते विश्व सदाची
शनी आणि रवी, जणू दोन कवी
काळजी न त्यास, जगाची
तू तुझी अन मी माझा
हे असं कुठे प्रेम असतं
एकमेकांना सावरून घेणं
हेच तर प्रेमात मेन असतं
मोटरीचा आलाय कंटाळा
आज पायीच फिरू दोघे
हातात हात, वाट ती लांब
चल जाऊ प्रीतिच्या ओघे