ओरड.....!

गेलेला वाईट दिवस
माघे वळून पाहत असतो
हसूच रुसते त्या दिवशी
डोकावत ज्या दिवसात असतो

झर झरणाऱ्या पावसात
आनंदात ओल भिजताना
डोळ्यातले डोळ्यात अश्रू
पावसाने पुसत असतो

शाश्वत नाही ह्या जगात
नाशवंत तर हे आहे
नको कुरवाळू मला
ओरडत दुःख हेच असते