काय चांगले काय वाईट न उमजे मजला
सांग काय असे , भेद दोन्हीत तू मजला
मनासारखे झाले असता म्हणती चांगले
मनाविरूद्ध झाले असता वाईट असे भले
वाईट गोष्टी असे, म्हणून भाव चांगल्यास
वाईट पार्श्वभूमीवर, खुले ते चांगले रुपास
वाईटातुनी चांगले निपजे, माहिती जगाला
वाईट असे पायरी, चांगले ते शिकावयाला
प्रथम खेळतो वाईट, मग सुधारे खेळ जरी
वाईटातूनीच सुधार होई, माहिती असे जरी
एकास गोष्ट वाईट, तीच दुसऱ्यास चांगली
काय म्हणावे अशावेळी, वाईट का चांगली
वाईटातून चांगले शोधण्याचे ज्यास भान
त्यास मिळे जगती, यशस्वीतेचा बहुमान
लक्षात ठेवावे, चांगले, वाईट कांही नसते
आपुली दृष्टी ठरवे, डावा, उजवा मनांते