सैरभैर झाले होते मन
थरथरत होते सारे तन
शोधत, नदी, नाले, रान
दिसले मग केतकी बन
हिरवे कंच, पसरले बन
काटेरी लांब त्याची पानं
लागली सुवर्ण कणसे छान
मन झाले त्यात रममाण
डोलती सुवर्ण कणसे छान
हितगुज करतो समीरण
सुगंधित आसमंत जाण
भुजंग त्यात देती हो ठाण
मोह होई खुडण्यास कणीस
झेपावत केले मी, ते साहस
पाने करती रक्षण, झकास
येई रक्त ते, कंटकाने खास
दिसते सुवर्ण कणीस सुंदर
मागे घेतला हात मी सत्त्वर
ऐकू आली सळसळ,फुत्कार
सैरभैर मन झाले शांत हळुवार