मारीशी कुठे ठोसा
कुठे रक्तबंबाळ होशी
मुक्त फिरे जी मनुचरी
पिंजऱ्यात उभी करू कशी
एक एक पाऊल तुझे
पाय वाट दावते
रुतला टाचित काटा
आड वाट पाहू कशी
कल्लोळात भावनांच्या
सांग तुला जगवू कशी
माझीच तू मिरवते इथे
सांग तुला फसवू कशी
वेदनांना इतरांच्या
तूच टाहो फोडते
वेदनेतच जन्म तुझा
सांग तुला प्रसवू कशी
शब्द : मनुचरी = मानवांच्या समाजात (वनचरी वरुन)