अनिरुद्ध

एकदा देव मला प्रसन्न झाला
म्हणे,'कुठला वर हवा बेटा तुला?'

मला देवाने नमागताच सारे काही दिलेले
काय मागावे हे मज पामराला न उमगलेले

नुकतेच होते हरवले मातृछत्र
उणीव मनात होती तीच मात्र

'मज माझी हवी आई' नकळत साश्रु बोलले
हे ऐकूणी प्रेमळ देवाच्याही डोळ्या अश्रु दाटले

'बेटा हे नको मागू, दुसरे काही सांग
मनातली कुठलीही गोष्ट मला तू माग'

खूप विचार करुनही मज उमगत नव्हते
काय मागु काय मागु हा विचार करत होते

देवानेच मला स्वत:चा अंश दिला
'सुखी हो' असे म्हणुन अदृष्य झाला

हाच दैवी अंश 'अनिरूद्ध' च्या रुपाने लाभला
आयुष्यभर पुरेल येवढी संपत्ती देवाने दिली मला