आरसा
प्रिये का ठेवून गेलीस आरसा
तुझ्या आठवणींचा वारसा
पारा जरी उडाला, आहे आठवणीचा मुलामा
अजुनी दिसते त्यात तुझी प्रतिमा
अजुनी शहारतो आठ्वुनी
केसातून स्पर्श फिरणारा
डोक्यात खूळ भरणारा अन
उरात वारा भरणारा
विझले निखारे उरातले
संपले दिवस भरातले
आता उरल्यात केवळ आठवणी
अन डोळ्यात केविलवाणे पाणी