एक उनाड संध्याकाळ...

एक उनाड संध्याकाळ...

वादळात विस्कटलेले संदर्भ

आणि

" तुम नही, गम नही, शराब नही... ऐसी मेहफिल का कोई जवाब नही "

या गझलेला कुरवाळणारे जगजीत सिंग चे अंतरीचे शब्द

सैरवैर वादळाच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या घरट्याला

पूर्ववत बांधायला कधी जमलं असावं का कुणाला?

वेगाने समोर सरकणारे क्षण....

आठवणींच्या कप्प्यात कवटाळण्यासाठी झगडणारे मन.....

सगळंच अगदी इतिहासजमा झालेलं..!!!

एक अनामिक भय अवेळी पाठलाग करतेय आजकाल.

काळजावर घाव घालताना जखमांना जपलंय का कधी कुणी?

भूतकाळाचा हृदयाशी घात... आणि.... अपयशाची स्वतःवर मात....

अजूनही जपतोय. मात्र...

शरण येईल ते अपयश कसलं?

जिवापाड जपलेल्या पाखराने पिंजरा तोडून  पळ काढावा

तशीच दैना या जीवाची.

वर्तमानाची सीमारेषा संपण्यापूर्वीच भविष्याचा जीवघेणा डोंगर स्वतःखाली चिरडतोय मला.

जाणीवेने आलेला 'तो' मृत्यू हाच असावा का?

चांदण्यांना मोजणं कधीचच सोडलंय

मात्र

आसमंताच्या भावनांच काय?

आपण उगाच कुरवाळतोय जखमांना

इतरांचं बाकी बरं असतं....

सहा वाजले की वैयक्तिक आयुष्याला सुरुवात करायची.

आपण मात्र नशिबाच्या चक्रव्यूहात अडकलेले.

---------प्रविण  वा. रोहणकर  (९३२०१६०७०७)