भिजलो असा सचैल, मी पावसात पुढच्या,
या आजच्या उन्हाचे, मज तकदीर ज्ञात आहे.
जाळो कितीक मजला, हे वणव्यातले निखारे,
अन देवो कितीक नियती, रक्तातले इषारे,
नक्षत्र ते मृगाचे, मी जपले अंतरात आहे.
फिरल्या नभी ग्रहांच्या, वक्रीच आज छाया ,
अन झाल्या फितुर दैवा, माझ्याच हस्तरेषा,
आवळीन मी तयांचा, जीव मनगटात आहे.
जगतो असा सदैव, स्वप्नात त्या उद्याच्या,
अन जाणतो खुणा मी, सुकल्या या नदीच्या,
मिळणार रुप मजला, जे जगवि़ख्यात आहे.
शैलेन्द्र....