कविमंडळ अध्यक्षपदाचे निकष

ऊपस्थितीच्या सातत्याने ओळख वाढवावी
कविता क्षेत्राशी फारशी जवळीक नसावी

दुसऱ्याची कविता तोंडपाठ म्हणावी
जरी ती स्वतःला कळलेली नसावी

बक्षिसे, काव्यप्रसिद्धी फार काही नसावी
लाळघोटेपणावर जबर पकड असावी

तज्ञ श्रोतृस्त्रीवर्गाची आवड ओळखावी
कशालाही दाद देण्याची कला अंगी बाणवावी

चुकून मिळालेली बक्षिसपात्र कविता सर्वत्र म्हणावी
उभरत्या बुजऱ्या कवींची मुंडी मुरगाळावी

लायकी नसतानाही बिरुदे निर्लज्जपणे मिरवावी
पैशाने खरिदली जाणारी मंडळी बाळगावी