अडाणीपणाच्या काचा..

या माझ्या अडाणीपणाच्या काचा
पसरल्या आहेत माझ्या रस्त्यावर

निसटून गेल्यासारखा वाटतो
त्याना उचलून फेकण्याचा काळ

ही कवितेची वही घेऊन
या काळाच्या वेगाशी वेग जुळवताना
मी रोजच होतो रक्तबंबाळ...

मी उपटून फेकली असती कविता
पण तिच्यासोबत जगणंच उपटून येण्याची जास्तं आहे शक्यता

तिने घाट्ट ध्रून ठेवली आहे माझ्या जगण्याची माती
कवितेमुळेतर लहरतोय थोडासा हिरवा रंग

नाहीतर अश्या उन्हाळ्यात कोण असतं कोणाचं
मी झाडांनाही सावली चोरताना पाहिलय...

                       वैभव देशमुख