कशासाठी ?

जगतेय कोण इथे कोणासाठी
शपथ आणि प्रेम ते कशासाठी
आजच पूर्ण झालं ना  आता !
चिंता उद्याची हि कशासाठी
          सुख पुरतं नाही कधी शिदोरीला
          दुःखाच्या पसाऱ्याचे ते काय ?
          आपलीच माणसे पसाऱ्यात पसार
          उसनं भविष्यन ते कोणासाठी ?
आपलाच आपले म्हणत सगळे
काळजाला बांधण्याचा हा प्रयास
येणारा श्वासास शाश्वततः न जाण्याची
जगणं आजच उद्यावर ते कशासाठी ?