आजचा अभंग

झाली पांडुरंगा! दरिद्री अवस्था;

कलियुग अस्ता! केव्हा जाय?

कुणी ना कुणाला! देतसे लंगोटी;

भल्याच्याही काठी! बसे माथा!

महाराष्ट्रामध्ये! संकटांचा पूर;

वाहे भरपूर! काठोकाठ!

सीमावाद आहे! तसा पाणीप्रश्न;

विजेचाही प्रश्न! सुटेल का?

भ्रष्टाचार येथे! असे शिष्टाचार;

सज्जनांचा फार! दुष्काळ गा!

अशाच आणखी! कित्येक समस्या;

रोज नव्या नव्या! उभ्या पुढे!

धाव आता देवा! पांडुरंग ब्रह्मा;

तुजवीण आम्हा! त्राता नाही!