काळ्या ढगाची सावली
थंड हवेला आसुसली
पाणी हसले आभाळी
बरसले घन पावसाळी
वृष्टी झालीच हो अती
झाली नाहिशीच माती
पक्षी थरारून जाती
कोठे देव्हारे तरंगती
गवत कडबा खाली
सरपणं चिंब झाली
हसू ओठी, डोळा पाणी
कधी ओसरेल पाणी
मरण हे पाणी
तरण हे पाणी
...
ओसरले पाणी
शेतकरी गाई गाणी
डोई घेतली ईरली
केली जोमाने पेरणी
लेवुनिया हिरवळ गहरी
बावरी सृष्टी ऊधळली
आरक्तच कड्या कपारी
धार झऱ्याची जरतारी
अवीट गंधात माखली
धरा सुखाने शहारली
शेते बहरून डवरली
छता टांगली शिंकाळी