मनात वारे दाटलेला
हृदयाच्या कोपऱ्यात साचलेला
पापणीच्या मिठीत बांधलेला..
............. पाऊस हा वेगळा!!
विनाकारण हि बरसलेला
अलगद गालावर तरंगलेला
आठवणीच्या पुरात वाहलेला
............. पाऊस हा वेगळा!!
कुणाला नकळत भिजवलेला
कधी खोडकर रुसलेला
डोळ्यातून नाजूक हसलेला
............. पाऊस हा वेगळा!!
भरपूर काही बोललेला
अगदी अबोला धरलेला
हातानं मोती टिपलेला
............. पाऊस हा वेगळा!!