जन्माला घालून कदाचित
विसरला असाशील तूही
काळीज देऊन माणसाला
हसला असशील तूही
फसव्या पाण्यानेच म्हणे
कालवली माती माणसाची
स्वतःच्याच कलेवरती कधी
फसला असाशील तूही
काळजाची कळ अशी
कळते का रे तुला आता
गायीच्या डोळ्यात पाणीनि
हंबरला असाशील तूही
एवढा का रे क्रूर माणूस
घडवला तू ह्या दुनियेत
दुनिया गाते तुझे गोडवेनि
लाजला असाशील तूही