माझ्या आईला नाय कलत
मी कं शिकतो ?
डीग्री म्हंजे कं, त्या नाय कलत
ती बोलतो,
सतरावीत हाय बाला माझा!
बं (आई) मना बोतली
सिकून मोठा हो बाला
सिकल्यान मानसात मानूस ऱ्हातो
नको घालेड्डा ऱ्हावू
नको हीथं तीथं खावू
स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी ऱ्हाती
शिस्त असती तीथं सरस्वती येती
स्वार्थापायी नको कोना लुबारू
मुंगलीच्या पायानं घुंगरू
देव ऐकतो अन साखर देतो
बाला खोट्यांस्नी नको घाबरू
सत्यानंच ऱ्हाते आबरू
ती बोतली,
सिकल्याने सुध्ध बोलशील
णं चा नं आन ळ चा ल , ड चा र न्हाई व्हनार
पुस्तकी भासा बोलशील अनं जग जिंकशील
नको बोलू झारी, गारी, लबारी लोक येरा बोलतील
मना ह्यो पटतो सारा
अहो आईची भाषा माझी
मी शिकलो पण संस्कार नाही विसरलो
आई ती आईच
कोनी कायीबी बोतला,
कोनी मना गाववाला बोतला
तरी, आईची भाषा मी नाही सोरनार.
प्रेरणाः कविता महाजन
ग्राफिटी वॉल.