आयुष्य खोडात पुसत जगलो

आयुष्य खोडत पुसत जगलो 
वेळ कसा  गेला कळलेच  नाही...
शाळेत गेल्यापासून खोडाय -पुसायची 
सवय लागली ती कधी गेलीच नाही !!!
पाटीवरचे पेन्सिलने लिहायचे 
चुकलेतर पाटीवर बळकण  थुंकायचे 
मनगटाने   खोडायचे, पुसायचे 
कशी शाळा संपली हे कळलेच  नाही .....
 
आयुष्य खोडत पुसत जगलो 
वेळ कसा  गेला कळलेच नाही.....
नापास झालेले कधी पुसता आलेच नाही 
कमी मार्क कधी खोडता  आलेच नाही .
नापास झालो देव धर्म केले 
उपास-तापास केले 
काय काय केले ते .माझे मलाच कळले नाही 
फक्त अभ्यास सोडून 
सगळे केले 
दिवस कसे गेले ते कळलेच नाही 
किती संत किती महंत पकडले 
कोणाला कसे भजावे ते कळलेच नाही 
हा धरत तो सोडत दिवस कसे गेले ते कधी कळलेच  नाही..
बोहल्यावर कधी चढलो 
नि कसा संसार केला 
कळलेच नाही 
कसा संतापलो कसा रागावलो 
समजून-उमजून कधी वागता आलेच नाही 
आयुष्य संपत आले 
कसे कधी कळलेच नाही
वेळ  कसा गेला कळलेच नाही ..!!!!