आपलं माणूस

आपलं माणूस कुठेतरी आहे

याची ज्याला जाणिव असते

एकटं एकटं वाटण्यासाठी

त्याच्याजवळ जागाच नसते

 

आठवणींचं आभाळ असतं

मनसोक्त उडण्यासाठी

एक प्रेमळ चित्र असतं

डोळे मिटून बघण्यासाठी

 

आपण काहीही करू शकतो

यावर त्याची भक्ती असते

आपलं माणूस कुठेतरी आहे

हीच त्याची शक्ती असते

 

तुषार जोशी, नागपूर