देवघरातल्या देवाजवळ बसून तर बघा
थोडावेळ क्षणभर नुसते बसून तर राहा
न मागता किती मिळते ह्याचा अनुभव तर घ्या ...?
देवघरातल्या देवाजवळ बसून तर बघा !!
देव्हार्यातला मारुती तुमचा प्राण होईल बघा
रामनाम तुमचा श्वास झाला नाहीतर बोला..?
तुह्मी असाल सुखात तर कसा हसतो ते बघा
देवघरातल्या देवाजवळ बसून तर ब घा !!
दुःख कसे येते नि भोगतो कसे ते बघा
त्याने ठेवलेला पाठीवरचा हात जरा बघा ……!
देवाच्या हाताने काय होते ते तरी बघा
देवघरातल्या देवाजवळ बसून जरा बघा !!
ॐ काराचा ध्वनी कसा फुलतो ते बघा
मंद मंद गंध कसा पिसावतो मना
साहानीवर्च्या चंदनाचा रंग तो बघा
देवघरातल्या देवाजवळ बसून तर बघा….!!
डोळे मिटले की कसे शांत शांत वाटते
ध्यान कसे लागते ते न मोजता बघा
काळोखाच्या डोहामध्ये जाऊन तर बघा
देवघरातल्या देवाजवळ बसून तर बघा !!
झाडे कशी छान दिसतात फुलांचे रंग बघा
आभाळातील रंगाचा उत्सव जरा बघा
निळ्या निळ्या आभाळात देव दिसेल बघा
आभाळातील देवाचे ध्यान जरा लावा