आमची बायको...

आमची बायको फिरायचं म्हणते

क्वालिस गाडी करायला सांगते

किलोमिटरचा भाव

अन देवा मला पाव

बॅगांच्या चळतीवर मिल्टनचा हंडा

ड्रायव्हरने हळू हळू घातला गंडा

चहा, नाश्ता, तंबाखू मधूनच पेग

नाहीतर गाडी घेईल कशी वेग ?

वाईच झोपून घालवू का थकवा ?

फाय स्टार मध्ये लंच मला हवा

बायको म्हणते बघून झाडी

आता तरी दाखवा थोडी तरी गोडी

ताराचंदला थांबवा गडे

टेस्टी खाना खिलवा गडे

खर्चाचे मिटर भराभर वाढे

तोंडाला मग फेस येऊ लागे

बालचमूचे वेगळेच चाळे

कुरकुरे , वेफर्स , खारे काजू हवे

उशिराने तरी हिल स्टेशन आले

राखिव जागेसाठी झुंबड बाढे

कशीतरी जागेची समस्या सुटली

जेवताना पैशाची पर्सच हरवली.

टेन्शन खाली जेवण झाले

पर्शितले पैसे पडलेले दिसले

हुःsश.. म्हणून एकदाचे बिल भागवले

साईट सीईंग साठी सगळेच निघाले

पायथ्याशी पोचल्यावर

डायवरसाहेब आखडले

वरपर्यंत गाडी जाणार नाही म्हणाले

पायी जाणे मग भागच पडले

परतीच्या प्रवासाला ट्रॅफिक जाम

ड्रायव्हरसहित फुटला घाम

यापुढे बोलवू नका

पैशाचं आमिष दाखवू नका

जकात नाक्यापर्यंत सोडून देईन

तेथून रिक्षा पाहून देईन

तुमचं तुम्ही पाहून घ्या

माझं पाहायला येऊ नका

आमची बायको काळवंडली

काळी क्वालिस नको म्हणाली.