विटी दांडू

विटी दांडू

ठेउनी गलिवर मजला
आयुष्यभर कोललेस तू
विसरलास पण कोलताना
कैकवेळा वाकलास तू

दोन्ही टोकास कांडुनी
मांडलास छळ तू
किती ठिकाणी झेल
माझा दिलास तू

असेल हिंमत तर
ये पुन्हा खेळ मांडू
तू हो विटी अन
मी होते दांडू