नांदते जे मनात

नांदते जे मनात माझ्या त्यास कळले असता 
पैंजण तिचे वाजवी, माझ्या दारापुढचा रस्ता 
छुंमुक छुंमूक नाद तो लावून जाई नाद 
अंतरीच्या सुप्त प्रीतीला खडबडून येई जाग 
चाहूल भूल घाली, तो नाद देई आल्हाद 
आत्म्यास पुसटशी होई गतजन्मीची याद 
नकळत देऊन जाई त्यास हृदय माझे साद 
झंकारे ते सतार होऊन वर श्वासही देती दाद
क्षणभर येऊन जाते जेंव्हा ती दारातून निघून 
क्षणभर घेतो मी तेंव्हा स्वर्गामध्ये जगून
रिक्तता मनी दाटते ,असता सारे उणे वाटते
छुंमुक छुंमूक नसता, व्यर्थ मज हे जीणे वाटते