हलक्या फुलक्या पिसासारखे फुलपाखरू !!

हलक्या फुलक्या  पिसासारखे फुलपाखरू 
पंखावर मस्त रंगीत ठिपका 
गिरकी घेत  झुलत असते 
फुलांच्या गंध भारल्या  स्वप्नात 
  
फुले खुणावतात फुलापाखाराना 
खुळावतात त्याला आपल्या मत्त गंधाने  
फुलपाखरू धुंद ! मंत्रमुग्ध !!
खेचले जातात आपोआप  नकळत 
  
  
स्पर्श  करते फुलांना फुलपाखरू 
एक शहारा फुलाच्या रोमारोमात 
अग आईग केवढा काटा फुलला 
माझ्या गर्भ कोशात  सरसरून !!
 
 
पाकळी पाकळी मत्त  असते 
रेशीम रेशीम मस्त मुलायम 
पाकळीच्या स्पर्श सुखाने  
फुलपाखरू जाते मत्त होऊन 
  
आस कळीला जन्म घालण्यास 
फुले जातात वेडात हरवून 
नि ध्यान लागते फुलपाखराला 
दोघेही जातात स्वप्नात हरवून ...!!!!