ओळख...!

सगळेच ओळखीचे...
कारण सगळेच सारखे !
कान, नाक, डोळे, शरीरे तीच,
थोडा फरक दिसण्यात,
तरी सारख्याला बारके !

सगळेच ओळखीचे,
कारण एकाच हवेत शासोच्छवास,
आणि श्वास थांबले की,
जमीन किंवा आग शवास!

सगळेच ओळखीचे
कारण सगळ्यांच्याच भोवती
ठरलेली चौकट,
हात-पाय बांधलेले,सगळ्यांचेच
तरी धावतात, डोक्यावरल्या ओझ्यांसकट !

मीही ओळखीचा,
सगळ्यांच्या नाही,
निदान माझ्या तरी,
कारण मीही सगळ्यांतलाच,
तरी, वेगळा होऊ पाहतो कधी तरी...!

-चैतन्य