अनुभूतिंचा गाव...!
=========================
चहुदिशांस तुज शोधशोधले
केली नसती धावाधाव,
आज सख्या कळला.. कळला तुझा ठाव...!!!
नयन रोखुनी मलाच पाहसी
जैसा मृदुल साव,
आर्तपणे मी तुज विनवावे..
तू भक्तीतला भाव...!
आज सख्या कळला.. कळला तुझा ठाव...!!!
मैत्राचा हा नेम जाणिता
किंतुस कुठला वाव,
प्रतिसादास्तव सदैव तत्पर..
तू सुसंवादा नाव...!
आज सख्या कळला.. कळला तुझा ठाव...!!!
विश्वासाच्या दृढ बंधनी
होवो समर्पण स्वीकार,
मज परिस तू मला जाणसी..
तू चैतन्याची बाव...!
आज सख्या कळला.. कळला तुझा ठाव...!!!
निरामय मी व्हावे तुजसम
गावे पसायगान,
तथास्तु तू वदसी सर्वथा..
तू अनुभूती चा गाव...!
आज सख्या कळला.. कळला तुझा ठाव...!!!
=========================
स्वाती फडणीस......................... २९१०१०
विश्वास